अकोला, 30 जुलै : राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेले मनसेच्या कार्यकर्ते जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार हे सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
अजित दादा गटाचे विधान परिषद आमदार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांनंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकर यांचाही सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे.
जय मालोकर यांचा मृत्यू –
दरम्यान, जय मालोकर यांना या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकारांच्या छातीत दुखत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण आता त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा : “एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले,” मुख्यमंत्र्यांबाबत मोठा दावा करत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?