मुंबई – देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईतून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. गोळीबाराच्या या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे.
वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली. 3 ते 4 तरुणांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यावर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांनी प्राण सोडला होता, अशी माहिती मिळाली.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. फटाके वाजवत असताना हा गोळीबार झाला असल्याची माहिती. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लीलावती रुग्णालयात संपर्क साधला असून झिशान सिद्दीकी तसेच अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल दाखल झाले आहेत. लीलावती रुग्णालयाच्या परिसरात कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे.
कशी घडली घटना –
बाबा सिद्धिकी 9.15 मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले होते. यादरम्यान, ते कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाला. फटाके फोडत असताना अचानक 3 जण गाडीतून उतरले. तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते. त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर 3 राऊंड फायर केले. बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. त्यांना छातीत एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले दाखल असून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.