• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

हातभट्टी दारूविरोधात जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 11, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
हातभट्टी दारूविरोधात जळगाव जिल्ह्यात मोठी कारवाई; १३४ गुन्हे नोंद, १४ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव, ११ जुलै : जळगाव जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारूच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. शासनाच्या “शून्य सहनशीलता धोरणा”नुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून आणि पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी तसेच राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक व्ही.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात धाडसत्र –

संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या एकाच दिवशी ९ जुलै २०२५ रोजी धाडसत्र राबविले. यामध्ये एकूण १३४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात दारू, कच्चे रसायन आणि एक वाहन जप्त करण्यात आले.

ही कारवाई अत्यंत ठोस आणि प्रभावी ठरली. या मोहिमेमध्ये एकूण ३३८५ लिटर गावठी हातभट्टी दारू, २०१५० लिटर रसायन (कच्चा माल) आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ₹१४,४८,६६२ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संयुक्त कारवाईत पोलिस विभागाने ९९ गुन्ह्यांची नोंद केली असून, २८४५ लिटर दारू आणि ५६३० लिटर रसायन जप्त केले.


अवैध दारू निर्मिती आणि विक्री विरोधात प्रशासनाने उचललं पाऊल –

या कारवाईची अंदाजित किंमत ₹६,१२,३८२ इतकी आहे. त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३५ गुन्ह्यांची नोंद घेतली असून, त्यांच्या कारवाईत ५४० लिटर दारू, १४५२० लिटर रसायन आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून त्याची एकूण किंमत ₹८,३६,२८० इतकी आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीवर रोख बसवण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आघात करणारे ठरणार आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कुठेही अवैध दारू उत्पादन, विक्री किंवा वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर माहिती द्यावी. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Video | ‘मंत्र्याच्या रूममधील पैशांच्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल’, संजय राऊतांनी केला खळबळजनक दावा; मंत्री संजय शिरसाट यांनी दिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: hand-made liquorjalgaon policemarathi newsstate excise departmentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page