• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking News : दुपारी घोषणा अन् लगेच मान्यता, नार-पार गिरणा प्रकल्पावर राज्य सरकारच्या बैठकीत शिक्कामोर्तब, नेमकं काय घडलं?

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 25, 2024
in महाराष्ट्र, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking News : दुपारी घोषणा अन् लगेच मान्यता, नार-पार गिरणा प्रकल्पावर राज्य सरकारच्या बैठकीत शिक्कामोर्तब, नेमकं काय घडलं?

मुंबई : अखेर गेल्या अनेक दिवसांपासून खान्देशच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ज्या नार-पार गिरणा प्रकल्पाची चर्चा होत होती, त्या प्रकल्पावर आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं आहे. नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या नार पार गिरणा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

7 हजार 15 कोटींसाठी मान्यता –
नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. यामध्ये या प्रकल्पासाठी 7 हजार 15 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता या प्रकल्पामुळे नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.

नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा –
नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पाची किंमत 7 हजार 15 कोटी 29 लाख एवढी आहे. या नदी जोड प्रकल्पातून नार, पार, औरंगा या तीन नदींच्या खोऱ्यातून 9 धरणांमधून 9.19 टीएमसी पाणी उचलून 14.56 कि.मी. बोगद्याद्धारे गिरणा नदी पात्रात चनकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येईल. सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे.

पाचोर्‍यातील सहकारी सूत गिरणीस अर्थसहाय्य –
आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पाचोर्‍यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विविध प्रकल्पांसह नार-पार गिरणा प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय –
1) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येणार आहे. मार्च 2024 पासून अंमलबावणी सुरु होईल. लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

2) नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. 7 हजार 15 कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

3) गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ

4) ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार

5) थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी

6) पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार

7) राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली

8) सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

9) शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

10) ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

11) ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार

12) ‘बार्टी’ च्या ‘त्या’ ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ

13) मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार

14)कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ

15)कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ

16)चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

17)श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना

18)पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य

19)सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन

हेही वाचा : नार पार गिरणा प्रकल्प : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: cabinet meetinggirna rivermaharastra governmentnar par girna river project

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page