• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Breaking : आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, अंतिम टप्प्यातील सामने थांबवले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 9, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
Breaking : आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, अंतिम टप्प्यातील सामने थांबवले

नवी दिल्ली, 9 मे : भारत आणि पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींमुळे भारताकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जातेय. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग अर्थात आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत-पाकच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अंतिम टप्प्यातील सामने थांबवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय.

धरमशाळा मैदानावरील सामना झाला होता रद्द –
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पंजाब किंग्स विरूध्द दिल्ली कॅपिटल्सचा सामना काल धरमशाळा क्रिकेट मैदानावर सुरू होता. मात्र, पाकिस्तानकडून जम्मू, राजस्थान तसेच पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी धरमशाळा मैदानावरील सामना रद्द करण्यात आला. तेव्हापासूनच आयपीएलचे पुढील सामने खेळवले जातील की नाही, याबाबत बीसीसीआयकडून मोठी भूमिका घेतली जाण्याची शक्यता होती.

आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित –
भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. पाकिस्तानाकडून ड्रोन हल्ले केले गेल्याने खेळाडू तसेच क्रिकेट मैदानात उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला जात होता. दरम्यान, खबरदारी म्हणून आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

उर्वरित 16 सामन्यांना स्थगिती –
भारतात सध्या आयपीएलचा 18 वा हंगाम सुरू होता. अंतिम टप्प्यात हा हंगाम आला असतानाच बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएलच्या उर्वरित 16 सामन्यांना स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे परदेशी खेळाडू हे देखील आता त्यांच्या मायदेशात परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आयपीएलचे उर्वरित 16 सामने कधी खेळवले जातील, याबाबत अधिकृतरित्या माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीये.

हेही वाचा : Breaking! पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांमुळे वातावरण तापलं; भारताची लाहोरमधूनच प्रत्युत्तरास सुरूवात

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: bccibreaking newsiplstaysuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

    सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

    May 31, 2026
    IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

    IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

    May 31, 2026
    ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

    ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

    May 30, 2026
    मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

    मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

    May 30, 2026
    Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

    Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

    May 30, 2026
    भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

    भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

    May 30, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page