नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मधुकर पिचड यांचा जन्म हा 1 जून 1941 रोजी झाला होता. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे शिक्षक होते. तसेच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीए एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात केली होती. यानंतर पिचड यांनी आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते. तसेच 2014 मध्ये अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले. दरम्यान, 2019 मध्ये पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
माजी मंत्री मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास –
– मधुकर पिचड यांनी 1961 मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली
– अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून 1972 ला निवड
– 1972 ते 1980 पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड
– 1980 पासून 2009 पर्यंत सलग 7 वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले
– मधुकर पिचड यांनी 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
– 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
– राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळही होती.
– मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला.
– राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, 2014 ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले
– 2019 ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.