• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Dhule Crime News : पेट्रोलपंप उभारणीकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली अडीच लाखांची लाच, सरपंच अन् माजी सरपंचाला एसीबीने पकडले रंगेहाथ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2025
in क्राईम, ताज्या बातम्या, धुळे
Dhule Crime News

पेट्रोलपंप उभारणीकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली अडीच लाखांची लाच, धुळ्यात सरपंच अन् माजी सरपंचाला एसीबीने पकडले रंगेहाथ

धुळे : गेल्या काही दिवसात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरही तलाठी, सरपंच हे लाचेची मागणी करताना दिसत आहे. यातच आता आणखी एक घटना समोर आली आहे. पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी धुळे तालुक्यातील नंदाणे येथील लाचखोर सरपंच व माजी सरपंच यांना धुळे एसीबीने अटक केली.

सरपंच रविंद्र पाटील आणि माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदाराकडे पेट्रोलपंप उभारणीकरिता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तडजोडी अंती अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारतांना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

नेमकं काय आहे प्रकरण –

तक्रारदाराची धुळे तालुक्यातील नंदाणे येथील गट नं. 59/3 येथे शेतजमीन असून आहे. या जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्यासाछी कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच/ग्रामसेवकाच्या नावे पेट्रोलपंप उभारणी करीता ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते.

त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच रविंद्र निंबा पाटील, ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेवुन पाठपुरावा केला. मात्र, सरपंच रविंद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करीता आणि ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरीता 5 लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार 24 रोजी तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

या तकारीची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता सरपंच रविंद्र पाटील यांनी व त्यांच्यासोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 2 लाख 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्याचे मान्य केले होते.

त्यानंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत सरपंच रविंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन 1 लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारुन माजी सरपंच अतुल शिरसाठ यांच्याकड दिली असता त्यांनी ती स्विकारुन त्यांनी ते पैसे खिशात ठेवून दिले. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहाथ पकडले. यानंतर सरपंच रविंद्र पाटील आणि अतुल शिरसाठ यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

बोदवडचे तहसिलदार निलंबित; मालेगावात रुजू असताना ‘या’ प्रकरणामुळे झाली कारवाई

बातमी शेअर करा !
Share
Tags: acbcrimedhuledhule crimedhule newsgrampanchayatsarpanch

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page