नवी दिल्ली, 14 मे : भारत-पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव सुरू असतानाच 23 एप्रिल रोजी भारतीय सीमा सुरक्षा दलाचे जवान पूर्णम कुमार शॉ हे चुकून पाकिस्तानात हद्दीत गेले. अखेर, 22 दिवसांनी पाकिस्ताननं त्यांची सुटका केली असून आज सकाळी साडेदहा वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरुन पी.के. शॉ माघारी परतले.
नेमकी बातमी काय? –
गेल्या काही दिवासंपुर्वी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते. याच काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूर नंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ पाकिस्तानच्या ताब्यात होते. पाकिस्तानने पी.के. शॉ यांना 23 एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते.
पाकिस्तानने घेतलं होतं ताब्यात –
पूर्णम कुमार शॉ हे भारतीय सीमा सुरक्षा दलात कार्यरत असून भारत-पाक सीमारेषेवर शेतकऱ्यांच्या देखभालीसाठी भारतीय सैन्याने बीएसएफचे दोन जवान तैनात केले होते. असे असताना फिरोजपूरमध्ये 23 एप्रिलला जवान पी.के. शॉ यांनी चुकून सीमारेषा ओलांडली होती. ही गोष्ट पाकिस्तानी सैन्याच्या लक्षात येताच पाक रेंजर्सने पी.के. शॉ यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रे जप्त करत त्यांना पाकिस्तानने 20 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते.
अखेर, 20 दिवसांनी आज सुटका –
भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफचे जवान पी.के. शॉ यांना पाकिस्ताने ताब्यात घेतले होते. यानंतर बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बॉर्डरवर धाव घेतली होती. मात्र, त्यावेळी पी.के. शॉ यांची सुटका होऊ शकली नव्हती. तेव्हापासून भारताने पी.के. शॉ यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान, आज अखेर, 20 दिवसांनी पाकिस्ताननं त्यांची सुटका केली असून आज सकाळी साडेदहा वाजता अमृतसर येथील अटारी बॉर्डरवरुन पी.के. शॉ माघारी परतले असून बीएसएफने याबाबतची माहिती दिलीय.