मुंबई, 26 फेब्रुवारी : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आणि राज्यातील इतर प्रश्नांवरून विरोधकांना सरकारला घेरण्याची संधील असले. तसेच विरोधक राज्य सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
आजपासून सुरू होणाऱ्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2023-24 च्या पुरवण्या मागण्या मांडण्यात येतील. दरम्यान, या अधिवेशनात शेतकरी तसेच मराठासह अन्य समाजासाठी काही महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.
मराठा आंदोक मनोज जरांगे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा कुणबी अधिसूचनेविषयी सरकार काय निर्णय घेते याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी, मनोज जरांगे आक्रमक, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईच्या दिशेने रवाना