नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या वतीने खान्देशातील आमदारांशी खान्देशातील प्रश्नांवर, विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर संवाद साधला जात आहे. यामध्ये ‘सुवर्ण खान्दश लाईव्ह’ने धुळे जिल्ह्यातील शिंदखेडाचे आमदार आणि विद्यमान महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’ चॅनेलला शुभेच्छा देत आगामी काळातील महायुती सरकारच्या विकासाचे व्हिजन सांगितले.