पाचोरा, 29 ऑगस्ट : कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगाव सी.सी. आय मार्फत सन-२०२५-२६ या कापुस हंगामासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु होणार आहे. या हंगामात कापसाचा हमीभाव ८११०/-रु.आहे. सी.सी.आय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना कापुस विक्रीसाठी नांव नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर ऑनलाईन कपास किसान अॅप द्वारे नांव नोंदणी सुविधा सी.सी.आय मार्फत सुरु केलेली आहे.
सदरचा कपास किसान अॅप हा दि.३०/८/२०२५ पासून गुगल प्लेस्टोअर वरून डाऊनलोड करून नाव नोंदणी ही दि.१/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ या कालावधीमध्ये करता येणार आहे. खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी व शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सोयीची राहणार आहे. यामध्ये शेतकऱ्याला सोईनुसार त्याचा कापुस विक्रीची तारीख व खरेदी केंद्र देखील निश्चित करता येणार आहे.
ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्याला कुठेही जाण्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्याला मोबाईल वरून सदरची प्रक्रिया राबवावी लागणार असल्यामुळे सोबत अद्यावत सन-२०२५-२६ चा कापुस पिक पेरा असेलला ७/१२, आधारकार्ड, मोबाईल नंबर व फोटो सोबत ठेवणे आवश्यक आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सी.सी.आय खरेदी केंद्रावर कापुस विक्रीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास खालीलप्रमाणे दिलेल्या मोबाईल नंबरवर बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती गणेश भिमराव पाटील, उपसभापती प्रकाश अमृत पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी केले.
आजही घरातील शेती हि वडिलधाऱ्या व्यक्तींच्या नावावर असते. नांव नोंदणी करता वयोवृद्ध व्यक्तींना केंद्रावर आणणे अडचणीचे असते. आता कपास किसान अॅप मुळे नांव नोंदणी प्रक्रिया घरातूनच मोबाईल द्वारे करता येईल. तसेच शेतकऱ्याला सोईनुसार त्याचा कापुस विक्रीची तारीख व खरेदी केंद्र देखील निश्चित करता येणार आहे, असेही सभापती गणेश पाटील म्हणाले.