चाळीसगाव, 7 सप्टेंबर : जेव्हा पावसाच्या लहरीपणाचा समाजाला फटका बसतो. तेव्हा-तेव्हा ‘झाडे लावा झाडे जगवा’ याची जाणीव आपल्याला होते. यासाठी आपण सर्वांनी वृक्षारोपणासोबत जतन करण्याची जबाबदारी घेण्याचे गरज असल्याचे प्रतिपादन उमंग महीला समाजशिल्पी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यांनी केले.
आज चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ जनजागृती मोहिमेचा शुभारंभ शहरातील प्रभाग क्र 9 मध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाला गणेश पाटील मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. सुरुवातीला संपदा पाटील यांच्या हस्ते महादेवाची आरती करण्यात आली. उपस्थितांसह संपदा पाटील यांनी वरूण राजाकडे साकडे घातले.
यानंतर प्रभागातील अयोध्या नगर, शिवदर्शन नगर ,श्रीराम नगर, पोस्टल कॉलनी या परिसरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांना जतन करण्यासाठी ट्रिगार्ड लावण्यात आले. मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी अभियानाचा उद्देश विशद केला. सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक डी एस मराठे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.
कोण-कोण होतं उपस्थित –
याप्रसंगी बंडू जाधव, रमेश पाटील, पांडुरंग राजपूत, बारीकराव अहिराव, प्रभाकर भेंडेकर, विजय पवार, भिकन पवार,दीपक जगताप, मनोज निकम, दामोदर माळी, सुदाम तिरमली, अविनाश घुगे, गणेश गोसावी, सुनील भोसले, रमेश पाटील, सोपान पाटील, देसले सर, कुवर बाबा, मोहिते सर, बाबा महाजन, गणेश पाटील, रमाकांत शिरसाठ, गायकवाड सर , हिरामण पाटील, शुभम राजपूत, अहिरे सर, ऋषिकेश पाटील, प्रसन्न निकम, मयूर राजपूत, कौशल चव्हाण, नयन ब्रह्मेच्या, आशिष खूपसे, ओम पाटील, शुभम पाटील, वैभव राजपूत व सर्व नवनाथ नगर ,आयोध्या नगर शिवदर्शन नगर, श्रीराम नगर पोस्टल कॉलनी, या परिसरातील सर्व नागरिक व महिला उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकुण 17 खुले भूखंड हिरवेगार करण्याचा संकल्प गणेश पाटील मित्र परिवार यावेळी केला. स्वच्छ्ता निरिक्षक सचिन निकुंभ यांनी आभार मानले.