• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बिबट्याच्या हल्ल्यात मृतक इंदुबाई पाटील यांच्या वारसांना 10 लाखांचा धनादेश सुपूर्द; शेतकरी-पशुपालकांना पालकमंत्र्यांनी केले महत्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 10, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यात मृतक इंदुबाई पाटील यांच्या वारसांना 10 लाखांचा धनादेश सुपूर्द; शेतकरी-पशुपालकांना पालकमंत्र्यांनी केले महत्वाचे आवाहन

जळगाव, 10 ऑगस्ट : देवगाव येथील घटना अतिशय दुर्दैवी असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी ट्रॅप व पिंजरे लावण्यात आले असून RRT पथक सतत गस्त घालत आहे. शेतकरी व वनमजूर यांनी शेतात जाताना एकटे न जाता समूहाने जावे, गुरेढोरे बंदिस्त ठेवावीत आणि विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मृतकाच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, एकूण 25 लाखांच्या आर्थिक मदतीपैकी आज 10 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून, उर्वरित 15 लाख रुपयांचा धनादेश लवकरच देण्यात येईल. प्रशासन व वन विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेमकी घटना काय? –

मेहरूण परिमंडळातील मौजे देवगाव फुकणी येथे दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजता शेतात कपाशी पिकाची निंदणी करत असताना वन्यप्राण्याच्या हल्ल्यात 73 वर्षीय इंदुबाई वसंत पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांचे शेत (गट क्र. 55) गिरणा नदीलगत असून, वनपरिक्षेत्र एरंडोल व राजवड यांच्या सीमेजवळ आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर शेतकऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देऊन वन्यप्राणी हुसकावून लावला. पोलिस पाटील यांनी वन विभागाला कळवून घटनास्थळी वनक्षेत्राधिकारी, कर्मचारी, RRT पथक आणि पोलिस विभागाने धाव घेऊन पंचनामा केला. घटनेनंतर त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे व पिंजरे बसवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी फुकणी गावाजवळ बिबट्याने गायीवर हल्ला केल्याची घटना घडली असून, त्यावरही तातडीने कारवाई करण्यात आली आहे.


वारसांना पालकमंत्री यांच्या धनादेश सुपूर्द –

शासन नियमांनुसार एकूण 25 लाख सानुग्रह अनुदानापैकी मृतकाच्या वारसांना आज 10 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर, नायब तहसीलदार राहुल वाघ, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, दूध संघाचे संचालक रमेश आप्पा पाटील, शेतकी संघाचे विजय पाटील, दिपक सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, सरपंच जितु पाटील, किशोर पाटील, समाधान सपकाळे, योगेश पाटील, दिलीप आगिवाल, गोपाल जिभाऊ, मुरलीधर अण्णा पाटील, प्रमोद सोनवणे, बाला शेठ राठी, गजानन सोनवणे, वनपाल उमाकांत कोळी, वनरक्षक भरत पवार, अजय रायसिंग, रहीम तडवी, हरेश थोरात, विलास पाटील, राहुल पाटील, गोकुळ सपकाळे, पोलिस पाटील रमेश पाटील तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्राधिकारी नितीन बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी केले, तर आभार पोलिस पाटील रमेश पाटील यांनी मानले.

हेही वाचा : दुःखद! भडगाव तालुक्यातील गुढे गावचे वीर जवान स्वप्निल सोनवणे यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

बातमी शेअर करा !
Share
Tags: guardian minister gulabrao patiljalgaon newsleopard attacksuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page