पाचोरा, 20 फेब्रुवारी : संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल 19 फेब्रुवारीला उत्साहात साजरी केली गेली. पाचोऱ्यातही काल सार्वजनिक शिवजयंती सोहळ्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
यावेळी पाचोरा तालुका शिवसेना नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनाही अभिवादन केले. याप्रसंगी वैशालीताई यांनी सर्वांना एकजूटीचा आणि समानतेचा संदेश दिला.
याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. यात दिपकसिंग राजपूत (शिवसेना जिल्हाप्रमुख), अरुणभाऊ पाटील (जि.प्र. शेतकरी सेना), उद्भवभाऊ मराठे (उपजिल्हाप्रमुख), रमेश बाफ़ना (ता.प्र. शेतकरी सेना, पाचोरा), शरद पाटील (तालुकाप्रमुख), विनोद बाविस्कर (उपजिल्हा संघटक), अभय पाटील (मा. उपजिल्हाप्रमुख), धर्मराज पाटील (उप जि. समन्वयक), देवीदास पाटील (तालुका संघटक), ज्ञानेश्वर पाटील (ता. समन्वयक), अनिल सावंत व दिपक पाटील (शहर प्रमुख,पाचोरा), दत्ताभाऊ जडे आणि राजेंद्र राणा (शहर संघटक, पाचोरा), दादाभाऊ चौधरी व बंडु मोरे (शहर समन्वयक) यांची उपस्थिती होती.
हेही वाचा – लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये घुमला “जय शिवराय’ नारा, शिवजयंती उत्साहात साजरा, पाहा VIDEO
हेदेखील होते उपस्थिती –
तर यासोबतच दिपक पाटील (उपजिल्हाप्रमुख, भडगाव), अनिल पाटील (तालुका प्रमुख भडगाव), जे.के.पाटील (वि.स.क्षेत्र.प्र.भडगाव), शाम महाजन (उपजिल्हा संघटक, भडगाव), गोरख पाटील (उपजिल्हा समन्वयक, भडगाव), फकिरा पाटील (तालुका संघटक, भडगाव), जीभाऊ पाटील (ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पाचोरा), राजेन्द्र सिंग राणा, अभिषेक खंडेलवाल, संजयभाऊ चौधरी, बबलू भाऊ भोई, नितीन लोहा, तिलोतमा ताई मौर्य (उपजिल्हा संघटिका महिला आघाडी, पाचोरा), संदीप जैन (युवासेना उपजिल्हाप्रमुख), भुपेश सोमवंशी (युवासेना तालुकाप्रमुख), पप्पु राजपूत, गफ्फार दादा, राजेंद्र भैय्या, विनोद राउ, हरीश देवरे (यु.शहरप्रमुख), प्रशांत सोनार, गौरव पाटील, जगदिश महाजन, पप्पू जाधव, अजय पाटील, प्रतीक पाटील, चंद्रकांत पाटील, लोकेश पाटील, निलेश गवळी, सचिन तेली, विशाल पाटील, ओम पाटील, रूपेश पाटील, येवले ताई, जयश्रीताई, अनिता ताई, कुंदन पण्ड्या, सौ. पारोचेताई आदी पदाधिकारी उपस्थित होते.