• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 20, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Chief Minister Devendra Fadnavis lays the foundation stone for the new building of a 50-bed sub-district hospital in Dharangaon

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

धरणगाव, दि. २० जून : धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २.५ एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहेत.

या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंध केंद्र अशा सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

“धरणगाव हे ऐतिहासिक शहर असून, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या शेजारी ही सुविधा उभारली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे. एकही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे आभाराची प्रतिक्रिया दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

नवीन पोलीस ठाण्यांची मागणी –

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्र आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत म्हसावद दूरक्षेत्र यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच धरणगाव येथील जुने पोलिस ठाणे आवार हे जीर्ण झाल्याने त्याठिकाणी ५० शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी अंदाजे १५ कोटी रुपये निधी मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasaddevendra fadnavisdharangaondharangaon newsgulabrao patiljalgaon newsraksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यासोबत भेट; भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; नेमंक काय म्हणाले?

Video | एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यासोबत भेट; भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; नेमंक काय म्हणाले?

August 7, 2025
जळगाव जिल्हा वासियांसाठी खुशखबर! पुण्याला जाण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, ‘असे’ आहे वेळापत्रक

जळगाव जिल्हा वासियांसाठी खुशखबर! पुण्याला जाण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, ‘असे’ आहे वेळापत्रक

August 7, 2025
“सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी!” राज्य शासनाचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नेमकं काय?

“सरपंचांसाठी गावांच्या विकासाची मोठी संधी!” राज्य शासनाचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नेमकं काय?

August 7, 2025
Pachora News : पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावातील वाहिवाट वादावर लोकअदालतीत तोडगा

Pachora News : पाचोरा तालुक्यातील शेवाळे गावातील वाहिवाट वादावर लोकअदालतीत तोडगा

August 6, 2025
अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी महावितरणची शिबिरे; चार अवलंबितांना नियुक्तीपत्राचे तात्काळ वाटप

अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी महावितरणची शिबिरे; चार अवलंबितांना नियुक्तीपत्राचे तात्काळ वाटप

August 6, 2025
उत्तराखंड ढगफुटी: जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित, जिल्हा प्रशासनाची तत्परता 

उत्तराखंड ढगफुटी: जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित, जिल्हा प्रशासनाची तत्परता 

August 6, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page