जळगाव, 10 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, त्यांच्या दौऱ्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे धुळे येथे येत असताना खराब हवामानामुळे त्यांचे विमान धुळे विमानतळाऐवजी जळगाव विमानतळावर उतरविण्यात आले. त्यामुळे जळगाव येथून ते कारने ताफ्याने धुळ्याकडे रवाना झाले.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शासन आपल्या दारी अभियानातंर्गत धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पण खराब हवामानामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे विमान धुळे विमानतळाऐवजी जळगाव विमानतळावर उतरविण्यात आले. यावेळी आज दुपारी जळगाव विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कारने धुळ्याकडे रवाना झाले. खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे विमान धुळे विमानतळाऐवजी जळगाव विमानतळावर उतरविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. धुळ्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.