मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 7 ऑक्टोबर : चोपडा येथील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत 45 लाखाचा गांजा पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांना गुंगूरा देवून आरोपी फरार झाला. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मालापूर शिवारात नाबार्डच्या कंपार्टमेंट 211 च्या शेतीतील लागवड असलेल्या गांजाची शेती कसत असल्याचे गुप्त माहिती मिळाल्यावरून दिनांक 6 रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व यांची टीम गेली असता यांना सदरील शेतात गांजाची शेती करत असल्याचे दिसले.
45 लाखांचा गांजा जप्त –
यावरून त्या शेतीतील गांजाची रोप उपळुन काढले 7 ऑक्टोबर, सकाळी चार वाजेपर्यंत ही कारवाई चालली. ह्या कारवाईत तब्बल 750 किलोग्रॅमचे ओला गांजा आढळला. त्याची किंमत जवळपास 45 लाख रुपयांच्या घरात असावी, असा अंदाज गुन्हा नोंद मध्ये केलेला आहे आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा (रा. डॅडीया पाडा) तालुका चोपडा यांच्या शेतात गांजाची शेती आढळून आली. पोलीस गाडी आली असता आणि आरोपीच्या लक्षात आल्याने आरोपी हा फरार होण्यात यशस्वी झाला.
फरार आरोपीचा शोध सुरू –
याबाबत फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी -रुमाल्या चेचऱ्या पावरा रा.डेडियापाडा ता.चोपडा यांचा विरुद्धात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, उप पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पो.हे.कॉ.गणेश मधुकर पाटील करीत आहे.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : माजी आयपीएस अधिकारी Dr. Meeran Chadha Borwankar यांची विशेष मुलाखत