मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 11 नोव्हेंबर : चोपडा विधानसभा मतदारसंघात काल दिनांक 10 रोजी 85 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग असणाऱ्या मतदारांसाठी गृह मतदानाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. अशा 70 मतदारांपैकी पहिल्याच दिवशी 69 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एक मतदार बाहेरगावी गेले असल्याने त्यांचे मतदान करण्याची संधी त्यांना 14 तारखेला पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गृह मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, निवासी नायब तहसीलदार योगेश पाटील नियुक्त करण्यात आलेले क्षेत्रीय अधिकारी, नेमण्यात आलेल्या पाच पथकातील कर्मचारी पोलीस अधिकारी फोटोग्राफर अनेक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विधानसभा निवडणुकीसाठी 20 रोजी मतदान –
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमा जाहीर केल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा : देशाच्या सरन्यायधीशपदी न्यायमूर्ती संजीव खन्ना; आज घेणार शपथ