• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

‘गिरीशभाऊ हेही कुस्तीपटू, राजकारणातही त्यांनी…’, मुख्यमंत्री फडणीसांकडून गिरीश महाजनांचं कौतुक, म्हणाले,..

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2025
in जामनेर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Devabhau Kesari International Wrestling Tournament under Namo Kusti Mahakumbh-2 was inaugurated by Chief Minister Fadnavis.

नमो कुस्ती महाकुंभ-२ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि इतर मान्यवर.

जामनेर (जळगाव), 16 फेब्रुवारी 2025 : ‘गिरीशभाऊ हेही कुस्तीपटू होते आणि त्यांनी विद्यापीठस्तरीय कुस्तीत उत्तम कामगिरी केली होती. आता राजकारणातही त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चित केले आहे,’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे कौतुक केले. तसेच सध्या जागतिक पटलावर देशाचे, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आयोजित केलेल्या नमो कुस्ती महाकुंभ-२ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, माझी मंत्री आ. अनिल पाटील, आमदार सर्वश्री सुरेश भोळे (राजूमामा ) , मंगेश चव्हाण, संजय कुटे, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, अमोल जावळे, अनुपभैय्या अग्रवाल यांच्यासह कुस्तीगीर संघटनेचे रामदास तडस, जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, विविध देशांतून आलेले कुस्तीपटू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स किंवा अन्य स्पर्धांमध्ये देशातील, विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील काही काळात मॅटवरील कुस्तीमुळे आपण थोडे मागे पडलो होतो. मात्र, मातीवरील कुस्तीमध्ये आपल्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले आहे. कुस्तीच्या माध्यमातून देशाला ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळवून देणारे खेळाडू खाशाबा जाधव होते. आजही महाराष्ट्राचे खेळाडू विजय चौधरी, सोनाली मंडलिक, राजीव पटेल यांनी आपल्या खेळाची चमक दाखवत परदेशी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे.”

या स्पर्धेत नऊ देशांतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू सहभागी झाल्याने या स्पर्धेची रंगत अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. “आजच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू पृथ्वीराज पाटील, सोनाली मंडलिक, विजय चौधरी यांनी परदेशी खेळाडूंवर मात करत विजय संपादन केला. त्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल गिरीश महाजन यांचेही मनःपूर्वक कौतुक करतो. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शांततेत स्पर्धेचा आनंद घेतला, हेच या स्पर्धेच्या यशाचे खरे लक्षण आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासह फ्रान्स, रोमानिया, इस्टोनिया, उझबेकिस्तान, जॉर्जिया आदी देशांतील जागतिक विजेते, ऑलिम्पियन, हिंदकेसरी, रुस्तम-ए-हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी अशा नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेतला. अशा दर्जेदार स्पर्धांचे आयोजन जामनेरमध्ये होणे, हे कुस्तीच्या वाढीसाठी उत्तम वातावरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या कुस्तीपटूंना मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाला कुस्तीगीर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdevendra fadnavisdevendra fadnavis jalgaongirish mahajanjalgaon newsjamnerjamner newsmaharashtra political news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page