जळगाव, 16 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज 16 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून जामनेरात “नम्मो कुस्ती महाकुंभ – 2” या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच शेंदुर्णीतील “दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि.” संस्थेच्या अमृत ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळाव्याला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्र्यांचा असा असेल दौरा –
- दुपारी 3:45 वाजता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जळगाव विमानतळावर आगमन
- दुपारी 4:30 वाजता -जामनेर तालुक्याती शेंदुर्णी येथे वाजता “दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि” अमृत ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळाव्याला उपस्थिती
- संध्याकाळी 5:30 वाजता – श्री. गोविंद महाराज क्रीडांगण, हिवरखेडा रोड, जामनेर येथे आगमन
- सायंकाळी 6:00 वाजता – जामनेर येथे “नम्मो कुस्ती महाकुंभ – 2” या कुस्ती स्पर्धेचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
- संध्याकाळी 7.15 वाजता – जामनेर वरून जळगाव विमानतळाकडे प्रयाण
- रात्री 7.45 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन
- रात्री 7:50 वाजता – जळगाव विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण
जामनेरात नम्मो कुस्ती महाकुंभ – 2 कुस्ती सर्धा –
जामनेरात आज 16 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. 16 फेब्रुवारीला ‘नमो कुस्ती महाकुंभ’सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवान कुस्ती स्पर्धेत भिडण्यासाठी जामनेरात येणार आहेत. दरम्यान, या दंगलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक विजेता रवी कुमार दिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत