नागपूर, 15 एप्रिल : नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दरम्यान, नागपुरात उघडकीस आलेल्या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून प्रशासनास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
नागपुरातील शिक्षक भरतीचा घोटाळा नेमका काय? –
नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच या बोगस नियुक्ती आणि वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा नुकसान पोहचविल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने देखील हे त्यांच्या एका आदेशात मान्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दखलमुळे बोगस पद्धतीने भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात कोणत्याही दोषीला न सोडण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. यामुळे 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोषी आढळ्यास बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेण्याचे संकेत प्राप्त झाल्याचे कळते.
सरकारकडून कोट्यवधी रूपयांचे वेतन लाटले –
बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकारकडून कोट्यवधी रूपयांचे वेतन लाटले आहे. या प्रकरणी नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी आता पोलिसांच्यावतीने सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याचे देखील माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याच्या नोंदीही आता पोलिसांकडून घेण्यात येणार का, याकडे लक्ष लागले आहे.