जामनेर, 14 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, जामनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी ट्रक्टरवरूनच भीमगीतांवर ठेका धरला.
जामनेरात निघाली भव्य मिरवणूक –
जामनेरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंत्री गिरीश महाजन हे देखील या मिरवणुकीत सहभागी झाले. तत्पुर्वी, मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
View this post on Instagram
‘…अन् मंत्री गिरीश महाजन यांनी भीमगीतांवर धरला ठेका’ –
यानंतर जामनेर शहरात निघालेल्या भव्य मिरवणुकीत बाबासाहेबांची प्रतिमा असलेल्या ट्रक्टरचं सारथ्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले. दरम्यान, या मिरवणुकीतच उपस्थितांच्या आग्रहाखातर ड्रायव्हर सीटवर बसूनच मिरवणुकीत काही क्षण डान्स केला. त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.