• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

लाईट्स… कॅमेरा… ॲक्शन…! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 15, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
लाईट्स… कॅमेरा… ॲक्शन…! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

पणजी, 15 ऑगस्ट 2025 : माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन काल गुरुवार 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आयनॉक्स चित्रपटगृहात करण्यात आले. या सोहळ्याला एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, भाजपचे अध्यक्ष दामू नाईक, अभिनेता मोहम्मद अली, माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे संचालक दीपक बांदेकर , आयएएस अश्विन चंद्रू यांची उपस्थिती लाभली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काय म्हणाले? –

उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘गोव्याला कला आणि संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे. हीच परंपरा जगापुढे यावी या उद्देशाने सरकार प्रयत्नशील आहे. गोमंतकिय कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सरकार मनोरंजन क्षेत्राचा विकास करत असून हाच उद्देश ठेऊन राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा संस्थेच्या संचालकांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

या महोत्सवात येऊन गोव्यातील कलाकारांनी चित्रपट बघावे, चित्रपटाचे तंत्र शिकावे, आणि त्यांच्यातील थिएटरचे कौशल्य वाढवावे.  कोकणी, मराठीसारख्या स्थानिक भाषांचा विस्तार व्हावा, यासाठी सातत्याने या भाषेतील चित्रपटांची निर्मिती होणे गरजेचे आहे. अर्थात त्यासाठी एंटरटेंमेंट सोसायटी दरवर्षी सबसिडी आणि प्रोत्साहनपर पुरस्कार देत असते. गेली 75 वर्षे चित्रपट महोत्सव सुरु असून आमच्या चित्रपटांना कधी नॅशनल तर कधी ऑस्कर पुरस्कारही मिळाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले.


कार्यशाळा, चर्चासत्रांचा लाभ घ्या –

गोव्यासारख्या लहान राज्यात गेली 20 वर्षे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवात सहभागी होण्याऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांकडून देखील आम्हाला शिकायला मिळते. आजपासून सुरु होत असलेला हा महोत्सव म्हणजे चित्रपट क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी एक योग्य मंच आहे. पुढील चार दिवस या संधीचा लाभ गोव्यातील कलाकारांनी घ्यावा. सिनेकलावंत, चित्रपट निर्माते स्क्रीनिंग करण्यासाठी, कार्यशाळा, चर्चासत्र घेण्यासाठी सहभागी होणार असून त्यांच्याकडून देखील कलाकारांनी खूप काही शिकण्यासारखे मिळाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अपरिचीत गोवा स्क्रीनवर दाखवा –

बालभवनच्या माध्यमातून कलाकार घडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. गोव्यातील कलाकारांकडे टॅलेंट असून त्यावर फिनिशिंग होण्याची गरज आहे. गोवा एक क्रिएटिव्ह कॅपिटल आहे. मात्र, त्यासाठी चित्रपट संस्कृती रूजणे आवश्यक आहे. अर्थात याकामी सरकार नेहमी प्रयत्नशील आहे. गोवा म्हणजे फक्त समुद्र किनारे नव्हे. तर त्यापलिकडेही गोवा वसलेला असून राज्यात निसर्गसौंदर्याने नटलेला परंतु अपरिचीत असलेला भाग चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते- दिग्दर्शकांनी प्रेक्षकासमोर आणावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केले.

पुरस्कारांचे वितरण –

या महोत्सवातील फिचर फिल्म विभागात 21 पुरस्कार आणि नॉन फिचर फिल्म विभागात 7 पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्या पुरस्कारांमध्ये 19 फिचर फिल्म आणि 4 नॉन फिचर फिल्ममध्ये स्पर्धा आहे. 48 तासांच्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांची घोषणाही उद्घाटन सोहळ्यादरम्यानच करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पहिल्या स्वातंत्र्य दिनी सरकारकडून रोजंदारी कामगारांना मिळाली पगारी सुटी, काय होता हा ठराव? विशेष मालिका : राजभवनाचे किस्से – भाग 1

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm dr pramod sawantfilm festivalgoa state film festival 2025marathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

January 23, 2026
गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

January 23, 2026
Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

January 23, 2026
‘मनरेगा’ची जागा आता ‘VB-GRAM’ घेणार; ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवण्यासाठी मोदी सरकार सज्ज – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती

‘मनरेगा’ची जागा आता ‘VB-GRAM’ घेणार; ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवण्यासाठी मोदी सरकार सज्ज – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती

January 23, 2026
Update : जळगावसह उत्तर महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोसमधून माहिती  

Update : जळगावसह उत्तर महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोसमधून माहिती  

January 23, 2026
अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचा जळगाव जिल्हा दौरा; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अभिनेत्री सोनाली कुलकर्णींचा जळगाव जिल्हा दौरा; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

January 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page