ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 21 नोव्हेंबर : किशोरआप्पा पाटील हा माझा मानसपुत्र आहे. त्यामुळे त्याची हॅट्रीक करून दिली तर मी हा मतदारसंघ दत्तक घेणार आहे. येथील प्रलंबित गिरणा नदिवरील बंधाऱ्यांसाठी निधी देऊन ते पुर्ण करू, मंजुर एमआयडीसीत नविन उद्योग आणून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन मी या निमित्ताने देतो, तसा ही किशोरआप्पा हा विकासाला पक्का आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
महायुतीचे पाचोरा-भडगाव मतदार संघाचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजयी निर्धार’ सभेत बोलत होते. दरम्यान, आजची सभेला आलेली गर्दी पाहून किशोर पाटलांचा विजय निश्चित आहे. तर आप्पा हा विकास कामात वाघ असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
View this post on Instagram
लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम करणार –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांसोबत संवाद साधताना म्हणाले की, लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावू असे म्हणणार्या महाविकास आघाडीचा लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. तर आपले महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहीणींना 1500 वरून 2100 रूपये प्रति महीना देऊ असे वचन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आमच्याकडे देना बँक आहे तर विरोधकांकडे फक्त लेना बँक आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मात्र, विरोधक फक्त बोलतात कृतीत आणत नाही. त्यामुळे तुमच्या योजना बंद पाडू, असे म्हणणार्यांना आपण निवडून द्याल का? असा सवाल त्यांनी केला. याशिवाय लाडक्या बहीणींचा डिसेंबरचा हप्ता आपले सरकार आल्याबरोबर पुढच्या महीन्यात खात्यात जमा करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 10 हजार रूपये देणार –
महायुतीने शेतकऱ्यांना वीज बील मोफत केले आहे. तर मुख्यमंत्री सन्मान निधी 6 हजार रूपये देऊन बळीराजाचा सन्मान केला आहे. तर लाडका भाऊ योजनेतून तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सरकार आल्यावर या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 10 हजार रूपये देणार आहेत. तर कोरोना काळात काही जण घरात बसून, टीव्हीच्या माध्यमातून लोकांमधे होते. मात्र, आम्ही त्यावेळी पीपीई कीट घालून लोकांचे दुख: समजुन घेत होतो. त्यांना मदत करत होता, असा टोला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात ही अहिराणी भाषेतून करत उपस्थितांची मने जिंकली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी रवींद्र पाटील, राजेंद्र मोरे, विनोद बागुल, शिवसेनेचे प्रवक्ते प्रदीप देसले आदींनी मनोगत व्यक्त करत आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती –
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप केदार यांनी तर आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक तथा गांधीनगरचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल, खासदार स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, जि.प. माजी सदस्य विकास पाटील, डी. एम. पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, बाजार समिती सभापती गणेश पाटील उपसभापती पी.ए.पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शशिकांत येवले, भाजपचे विधानसभा संयोजक अमोल पाटील, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, संजय गोहील, सुनीता पाटील, युवती सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ प्रियंका पाटील, युवा नेता सुमित पाटील, शिवसेनेचे भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील, भडगाव शेतकी संघाचे भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, रिपाईच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा प्रियंका सोनवणे शिवसेनेचे शहरप्रमुख अजय चौधरी, बबलू देवरे, युवराज पाटील, किशोर संचेती प्रा. चंद्रकांत धनवडे,नंदू पाटील, राजेश पाटील,समाधान पाटील,प्रवीण पाटील,शहर प्रमुख सुमित सावंत, शरद पाटे, युवासेनेचे लखीचंद पाटील, जितेंद्र जैन, समाधान पाटील, सुधाकर पाटील, जगदीश पाटील, सुनील पाटील, रवींद्र पाटील, प्रमोद सोमवंशी, अविनाश कुडे, इंदल परदेशी, हेमंत चव्हाण, बापू हटकर, भाजपच्या रेखा पाटील, महिला आघाडीच्या सौ नंदा पाटील, मायाताई केदार उपस्थित होते.
हेही वाचा : “मयताच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्यांना ही जनता कधीही माफ करणार नाही” – आमदार किशोर आप्पा पाटील