मुक्ताईनगर, 21 ऑक्टोबर : लाडकी बहिण योजनेची घोषणा करून त्यासाठी एका महिन्यात प्रक्रिया संपुर्ण प्रक्रिया आम्ही एका महिन्यातच दोन हफ्ते लाभार्थी महिलांच्या बँकेत टाकले. मात्र, निवडणुकीसाठी लाडकी बहिण योजना आणली आणि निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल, अशापद्धतीचे काम विरोधकांकडून सुरू आहे.म्हणून आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लाडक्या बहिणींचे पैसै देऊन टाकले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात ते आज बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी गरिबी पहिली आहे आणि म्हणून मी ठरवले आहे देण्याची वेळ आली तर आपण द्यायचे. कोणी मायका लाल आला तरीही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. तुम्ही ताकद दिली तर दोन हजार-तीन हजार रुपये देण्यात येतील. महायुती सरकारमध्ये देण्याची दानत आहे. दरम्यान, मला बहिणी लखपती झालेल्या पाहायचे आहे, असेही एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात सांगितले.
‘चंद्रकांत पाटील विजयी झाल्याशिवाय राहणार नाही’ –
आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुक्ताईनगरात आल्यानंतर त्याठिकाणी झालेल्या स्वागाताने मी भारावून गेलोय. तसेच चंदु भैय्या एवढे लोकं जर तुमच्या प्रचारात उतरले तर तुमच्या विरोधातील उमेदवारांची डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय राहणार आहे. तसेच महायुती उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आ. चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या तिन्ही पक्षाचे झेंडे त्यांच्या हाती दिले आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले. दरम्यान, गेल्या दोन-अडीच वर्षांत मुक्ताईनगरच्या विकासासाठी 5 हजार रूपये करोड रूपयांचा निधी दिल्याचे सांगितले.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत