जळगाव, 8 डिसेंबर : राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला. तसेच काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी देखील लावली. दरम्यान, आता पुन्हा महाराष्ट्रात थंडीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तापमानाचा पारा घसणार आहे.
महाराष्ट्रात तापमानात घट होणार –
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक स्थिती असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाा पट्टा कमकुवत झाल्याने राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहणार आहेत. यामुळे येत्या 4 दिवसात महाराष्ट्रात तापमानात घट होणार असून 3 ते 4 अंशांनी तापमान कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडी कमी झाली होती. मात्र, आता पुढील काही दिवस आता थंडी वाढणार आहे. पुढील तीन दिवसांचे तापमान खालीलप्रमाणे असणार आहे.
- 8 डिसेंबर – कमाल तापमान – 11 अंश
- 9 डिसेंबर – कमाल तापमान – 9 अंश
- 10 डिसेंबर – कमाल तापमान – 9 अंश
हेही वाचा : धक्कादायक! अमळनेर तालुक्यात ओमनी कार-दुचाकीचा अपघात; 3 जण जागीच ठार