चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 10 जून : नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा काल शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये मात्र, अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळाले नाहीये. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात आता एक राज्यमंत्री पद मिळाले आहे. यावरून राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. महिनाभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार त्यांच्या मुळ पक्षात परतणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.
विजय वडेट्टीवार यांचा दावा –
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यानंतर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी असून यांना बोलायला जागा नाही. पार्टी संपली असून गेलेले अजित दादा किंवा शिंदे यांचे 40 आमदार घरवापसी करतील, अशी परिस्थिती आता निर्माण झालीय. संपर्क साधत असल्याची माहिती समोर येत आहे. चर्चा जोरात आहेत, कारण वारे हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. यामुळे महिन्याभरात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार त्यांच्या मुळ पक्षात परतणार, असा दावाही वडेट्टीवार यांनी केलाय.
अजित पवार यांच्यावर साधला निशाणा –
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, अजित दादांना जे पाहिजे ते मिळवायचा प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. कुणालाही मान सन्मान संख्याबळावर मिळतो आणि अजित पवारांची स्थिती सन्मान करण्यासारखी काही राहिले नाही. जे मिळेल ते खावे आणि राज्यमंत्रीपद मिळाले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. दरम्यान, नीट परिक्षेच्या मुद्यावर आक्रमक होत मी नीटची परीक्षा रद्द करण्याची मागणी केंद्राकडे केली असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.
हेही वाचा : Narendra Modi 3.0 : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बनले देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या हस्ते घेतली शपथ