• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपड्याच्या शिक्षकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग, न्यायालयाने दिला मोठा निर्णय, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 15, 2024
in चोपडा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
चोपड्याच्या शिक्षकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग, न्यायालयाने दिला मोठा निर्णय, नेमकं काय प्रकरण?

अमळनेर, 15 मे : चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील शिक्षकास आठ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व ७५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विद्यार्थीनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास अमळनेर जिल्हा न्यायाधीश पी. आर .चौधरी यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील हिंदी विषयाचे शिक्षक सुनील संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुख नगर चोपडा) याने 4 फेब्रुवारी 2023 रोजी शाळेतील एका वर्गाला खेळायला सोडले असता वर्गातील एक अल्पवयीन मुलगी वर्गात पाणी प्यायला आली. दरम्यान, त्याने त्या मुलीचा जबरदस्तीने विनयभंग केला.

तसेच 5 फेब्रुवारी रोजी शिक्षक पुन्हा तिच्या घरी गेला आणि 7 रोजी त्या शिक्षकाने त्या मुलीला फोन करून अश्लील संभाषण केले. मुलीचे वडील घरी आल्यावर मुलीने अचानक फोन बंद केला म्हणून त्यांनी रेकॉर्डिंग ऐकून पाहिले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी तिच्या आई वडिलांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक व पर्यवेक्षिका यांच्याकडे तक्रार केली व त्यांच्या उपस्थितीत चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपी सुनील भागवत यांच्याविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी केला. हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी यात नऊ साक्षीदार तपासले. तपासी अधिकारी ,पीडितेचा जबाब आणि फोन मधील रेकॉर्डिंग ग्राह्य धरत न्यायधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपी सुनील भागवत याला शिक्षा सुनावली.

न्यायधीशांनी काय म्हटलंय? –
न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी निकाल देता मत मांडले आहे की, आरोपी हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक शोषणासाठी चटावलेला आहे. त्याच्या संवादात त्याने इतर ही मुलींची नावे घेतली आहेत. आरोपी हा वासनेने अंध आणि उन्मत झालेला होता. म्हणून त्याला बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा 2012 च्या कलम 8 नुसार पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि 50 हजार रुपये दंड ,दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद, तसेच कलम १२ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास, व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास चार महिन्यांची साधी कैद अशी स्वतंत्र शिक्षा सुनावली आहे.

आरोपीस आठ वर्षांची शिक्षा –
न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी दिलेल्या निकालामुळे आरोपीला एकूण आठ वर्षे शिक्षा भोगावी लागून 75 हजार रुपये दंड भरावा लागेल. तसेच अपिलाचा कालावधी संपल्यानंतर दंडाची रक्कम पीडितेला द्यायची आहे. तसेच सरकारी वकिलांनी निवड्याची प्रत पीडितेस द्यायची आहे. पीडिता जिल्हा विधी सेवा समितीकडे अधिक भरपाई साठी तसेच तिच्या मानसिक आधारासाठी दाद मागू शकते, असेही आदेशात म्हटले आहे. पैरवी अधिकारी म्हणून नितीन कापडणे, राहुल रणधीर, उदयसिंग साळुंखे, हिरालाल पाटील यांनी काम पाहिले.

हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner courtChopda Crime Newschopda latest newschopda policemolestation case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page