• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

धरणगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर जमावाचा भ्याड हल्ला

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 20, 2024
in धरणगाव, ताज्या बातम्या
धरणगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर जमावाचा भ्याड हल्ला

धरणगाव, 20 नोव्हेंबर : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर 150 ते 200 जणांच्या जमावाने हल्ला करत मोटारीच्या काचा फोडल्याची तसेच पैसे हिसकावून घेतल्याची घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला गती दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते मंगळवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास पथराड (ता.धरणगाव) येथून पाळधी गावाकडे मोटारीतून येत होते. त्याचवेळी रेल्वे फाटकाजवळ 150 ते 200 जणांचा जमाव त्यांच्या मोटारीवर लाठ्या काठ्या घेऊन चालून आला. जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करत त्यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. पाटील यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या खिशातून पाच हजार रूपये काढून घेतले. त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखून मोटार पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला.

अशाच प्रकारे राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, प्रा.एन.डी.पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला. पैकी धनराज माळी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व खिशात असलेला मोबाईल हल्लेखोरांनी हिसकावून घेतला. याशिवाय मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरला. दरम्यान, सदरचे हल्ले महायुतीच्या नेत्याने सांगितल्यावरून करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

मंगळवारी रात्री उशिरा धरणगाव पोलिस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शिवसेनेचे उपनेते संजय सावंत, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी आदींनी भेट देऊन पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

हेही वाचा : Special Report : आज मतदान, जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमधील लढती वाचा एका क्लिकवर 

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokargulabrao patiljalgaon graminpoliticssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page