पुणे, 1 जून : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात आतापर्यंत अल्पवयीन मुलाच्या वडील-आजोबा आणि तो स्वतः अटकेत असताना त्याच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आज शिवानी अग्रवाल यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
अल्पवयीन मुलाच्या वडील-आजोबा आणि तो स्वतः अटकेत असताना तिची आई शिवानी अग्रवालचा देखील पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातात हात असल्याच पोलिसांना संशय होता. दरम्यान, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी शिवानी अग्रवालवर डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप होता. या आरोपांनंतर गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. मात्र, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवानी अग्रवाल यांचा शोध घेत त्यांना अटक केलीय. दरम्यान, आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल.
अल्पवयीन मुलाचे कुटुंबच जेलमध्ये –
पुणे पोर्श कार अपघात प्रकरणानंतर रोज धक्कादायक खुलासे समोर येत होते. श्रीमंत बापाच्या मुलाला वाचविण्यासाठी संबंधितांनी केलेले कृत्य पुणे पोलिस उघड करत आहेत. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलगा हा बालसुधारगृहात असून त्याचे आजोबा आणि वडील हे न्यायालयीनन कोठडीत आहेत. तसेच पबचालक, बारमालक आणि रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपाखाली ससून रूग्णालायीतील दोन डॉक्टरांना देखील पोलिसांनी अटक केलीय.
अल्पवयीन मुलाची आज होणार चौकशी –
पुणे पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून अल्पवयीन मुलाच्या चौकशीची परवानगी मिळण्यासाठी मागणी केली असता त्यांना ती परवानगी मिळाली आहे. दरम्यान, आज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्यावतीने अल्पवयीन मुलाचीही चौकशी करण्यात येणार आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त आणि दोन महिला पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची ही चौकशी करण्यात येणार असून या चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलाला घटनेसंबंधित अनेक प्रश्न विचारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात थांबविण्यासाठी विविध उपाययोजना करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद