• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

Crime News : इंस्टाग्रामवरील मस्करी अन् मैत्रीणीने घेतला गळफास, साताऱ्यातील धक्कादायक घटना उघडकीस

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 31, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
Crime News : इंस्टाग्रामवरील मस्करी अन् मैत्रीणीने घेतला गळफास, साताऱ्यातील धक्कादायक घटना उघडकीस

सातारा, 31 जुलै : सोशल मीडिया हे आभासी जग आहे असे म्हटले जाते. मात्र, या आभासी जगातील घटनांचा धक्कादायक परिणाम वास्तवातील जीवनावर कसा होईल, हे सांगता येत नाही. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यातून समोर आला आहे. इंस्टाग्रामवर तरूणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंट बनवत स्वतःच्याच मैत्रीणीची मस्करी केली. मात्र, त्या मैत्रीणीने थेट गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल 45 हून अधिक दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, याप्रकरणी फेक अकाउंट उघडून मस्करी केलेल्या तरुणीला पोलिसांनी अटक केलीय.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातल्या वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावातली तरुणी आणि दुसरी एक तरुणी दोघी मैत्रिणी होत्या. यात एकीने मस्करी करण्यासाठी मनीष नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट उघडले. त्यावरून आपल्या जवळच्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. यानंतर फेक अकाउंटवर दोघीही बोलत होत्या.

फेक अकाऊंटवरच्या मनीषच्या प्रेमात पडली –
दुसरी मैत्रिण फेक अकाउंटवरील मनीषला खरे समजून चक्क त्याच्या प्रेमात पडली. दरम्यान, भेटण्यासाठी तगादा लावला. मात्र, तरुणीने आणखी एक धक्कादायक कृत्य करत मनीषच्या प्रेमात पडलेल्या तरुणीला समजावण्यासाठी मैत्रिणीने आणखी एक शिवम पाटील नावाने अकाउंट काढले आणि त्यावरून आपण मनीषचे वडील असल्याचे सांगत त्याचा मृत्यू झालाय, असे प्रेमात पडलेल्या तरुणीला सांगितले.

अन् तरूणीने घेतला गळफास –
दरम्यान, मनीषच्या (फेक अकाऊंटवरील तरूण) मृत्यूचा धक्का प्रेमात पडलेल्या 24 वर्षीय तरुणीला सहन झाला नाही. दरम्यान, तिने नैराश्यातून 12 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली. तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकऱणी वाठार स्टेशन पोलिसात अकस्मात निधनाची नोंद झाली होती. मात्र, सायबर पोलीसांच्या तपासातून इन्स्टाग्राम अकाउंटबाबत डिटेल्स समोर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. आता या प्रकरणी संशयित तरुणीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : Big Breaking : वादग्रस्त महिला अधिकारी पूजा खेडकर यांचे IAS पद रद्द, UPSC ने केली मोठी कारवाई 

बातमी शेअर करा !
Share
Tags: fake instagram accountSatara Newssatara suicide newssuicidesuvarana khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page