• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी, लातूरात जनसन्मान यात्रेत नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 28, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली माफी, लातूरात जनसन्मान यात्रेत नेमकं काय घडलं?

लातूर, 28 ऑगस्ट : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. असे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरुन राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागितली आहे. अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत भाषण करताना पुतळा दुर्घटनेतील दोषींना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले? –
लातूर येथील जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले की, मी कधीही विरोधकांवर टीका केली नाही, आम्ही कामची माणसे आहोत. आम्ही 15 हजार कोटींचे वीज बिल माफ केले असून यामुळे शेतकऱ्यांनी आता फक्त मोटर चालू करायची आहे, मागच्या वीज बिलाचा विचार करायचा नाहीये. बाकी मी पाहतो, असे म्हणत अजित पवार यांनी वीजबिल माफी केल्याची माहिती दिली.

अजित पवारांनी मागितली माफी –
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मात्र, याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येणार असून मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून राज्यातील तेरा कोटी लोकांची जाहीर माफी मागतो. यातील सर्व दोषी लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. दरम्यान, त्यांनी पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली आहे. तसेच, या पुतळ्याचे काम चांगलेच झाले पाहिजे होते. हे सर्व लोक राष्ट्रनिर्मिती करण्यात अग्रेसर राहिले असून त्यांचे विचार कायमच आपणास प्रेरणा देत असतात. यातील जे दोषी असतील त्यांना सोडणार नाही असेही ते म्हणाले. दरम्यान, आज शब्द देतो की अशी चूक पुन्हा होऊ, नये यासाठी काम करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले.

लाडक्या बहिणींसाठी वेगळे पैसे –
अजित पवार पुढे म्हणाले की, आपल्या राज्याचे बजेट साडे सहा लाख कोटी रुपयांचे आहे. त्यातून आम्ही लाडक्या बहिणींसाठी वेगळे पैसे ठेवले असून यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून मी काम करतोय मला माहिती आहे, कसे काम करायचे, असे म्हणत लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरू राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमधील दोषींना फाशी आणि जन्मठेप सुनावण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितलंय.

राणे आणि ठाकरे समर्थकांमध्ये राडा –
महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वातील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तत्पूर्वीच याठिकाणी भाजपचे खासदार नारायण राणे व त्यांचे पुत्र उपस्थित होते. त्यामुळे, आदित्य ठाकरेंचा ताफा येताच राणे आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये किल्ल्यावरच राडा झाल्याचे दिसून आले. यामुळे राणे पिता-पुत्र आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : ‘आमदार, खासदार असताना काय केले?, उन्मेश पाटलांचे आंदोलन म्हणजे थोतांड’, मंत्री अनिल पाटील यांची जोरदार टीका

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawar jansanman yatraajit pawar jansanman yatra in laturdcm ajit pawarjansanman yatrasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page