पुणे, 14 सप्टेंबर : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा रंगत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलंय.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? –
हडपसर येथील जनसंवाद कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्ही ज्यावेळेस तिघंही एकत्र बसतो त्यावेळेस मला असं काहीही जाणवलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाचा मोठा अनुभव असून सर्वांना विश्वासात घेऊन ते प्रशासन चालवतात. स्वतः एकनाथ शिंदे यांची देखील मुख्यमंत्री पदाची कारकीर्द राहिलीय आणि त्यांचेही प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा, असा आमचा तिघांचा प्रयत्न असतो. दरम्यान, आमच्या तिघांचं व्यवस्थित चालू असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय.
View this post on Instagram
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराज? –
साडेचार लाखांपर्यंत लोकसंख्या आणि तब्बल 900 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी मुख्याधिकारी म्हणून नेमण्यासंदर्भात कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला दिले आहेत. आतापर्यंत ‘ड’ वर्ग महापालिकांमध्ये बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नव्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.
हेही वाचा : जळगावात ‘धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदि कर्मयोगी कार्यशाळा संपन्न