जळगाव, 17 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसीय जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून काल शनिवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यानंतर ते आज जळगावात विविध विकासकामांची पाहणी करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) समृद्ध खान्देश मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार जळगावात –
राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल रात्री उशिराने जळगावात दाखल झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह गुलाबराव देवकर आदींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार यांचा ‘असा’ आहे आजचा दौरा –
- सकाळी 8 वाजता – चिंचोली येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी.
- सकाळी 8: 50 वाजता – जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट
- सकाळी 10: 15 वाजता – जळगाव जिल्हा नियोजन भवनाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन तसेच आढावा बैठक
- सकाळी 11:15 वाजता – जळगाव जिल्हा नियोजन भवनात पत्रकार परिषद
- दुपारी 12 वाजता – . समृद्ध खान्देश मेळाव्याला मार्गदर्शन करतील.