• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video | पालकमंत्री गुलाबराव पाटलांची शहीद जवानांच्या स्मारकासाठी DPC मधील निधी खर्चाबाबत मागणी; उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 17, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Video | पालकमंत्री गुलाबराव पाटलांची शहीद जवानांच्या स्मारकासाठी DPC मधील निधी खर्चाबाबत मागणी; उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 17 ऑगस्ट : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज 17 ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी दुपारी नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी 29 शहीद जवानांच्या स्मारकासाठी DPC मधून 4 कोटी 35 लक्ष निधी खर्च प्रस्ताव विशेष मान्यता देण्याबाबत मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? –

नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील 11 आमदार तसेच 2 खासदार यांच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांनी शहीद जवानांच्या स्मारकासाठी डीपीसीमधील निधी खर्चाबाबत भूमिका मांडली. जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकासाठी डीपीसीमधून साडेचार कोटी रूपये खर्च करण्याबाबत त्यांनी मागणी केली.

…अन् गुलाबराव पाटलांची उपमुख्यमंत्र्यांनी मागणी केली मान्य –

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या मागणीच्या विचार केला असता, डीपीसी खर्चाबाबतचे आमचे जे नियम आहेत त्यामध्ये ते बसत नाही. पण राज्याच्या नियोजन विभागाला तसेच त्या खात्याच्या मंत्र्याला विशेष बाब म्हणून तो अधिकार वापरता येतो. त्यामुळे राज्याचा नियोजन मंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांची मागणी मान्य करून उद्याच एसीएस देवरा यांना याबाबतचे आदेश देतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांचे शहीद जवानांना अभिवादन –

देशाचे तसेच आपल्या सर्वांचे रक्षण करत असताना जे जवान शहीद झालेले आहेत, अशा जवानांचे स्मारक झाले पाहिजे.  क्वचितच अशा गावात शहीद जवान असतात आणि त्या गावाला वाटतं की शहीद जवानाचे स्मारक झाले पाहिजे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांची मागणी मान्य करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यावेळी अजित पवार यांनी शहीद जवान यांना अभिवादन केले.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा –

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 17 ऑगस्ट रोजी दुपारी जळगाव जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. या बैठकीत जळगाव जिल्हा सिंचन धोरण, खरीप हंगामाची तयारी, तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजना, शेततळे योजना, विभागीय क्रीडा संकुल उभारणी, गंगाखेड बेट पर्यटनासह विभागातील पर्यटन विकास, जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा व रेल्वे एकत्रीकरण, MIDC औद्योगिक विकास, बँकिंग पतपेढी आराखडा यांसह जिल्ह्यातील प्रलंबित व सुरु असलेल्या अनेक विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

यांची होती उपस्थिती –

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, खा स्मिता वाघ, आ. अनिल भाईदास पाटील, आ.सुरेश ( राजू मामा) भोळे, आ. किशोरआप्पा पाटील,आ. चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल पाटील, आ. अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm ajit pawarjalgaon latest newsmartyred soldiersminister gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page