मुंबई, 4 ऑक्टोबर : गेल्या अनेक महिन्यांपासून एमपीएससीची तयार करणारे विद्यार्थी हे गट ब आणि क पदांसाठीच्या जाहिरातीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी अध्यक्षांना फोन करत जाहिरात काढण्यासाठी विनंती केलीय. दरम्यान, एमपीएससी अध्यक्षांना येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिलीय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करत माहिती दिली की, शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासन सेवेतील ‘गट ब आणि क’ पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती.
आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2024
विद्यार्थी जाहिरातीच्या प्रतिक्षेत –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त गट-ब व गट-क-2024 च्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत आहेत. गेल्या जून महिन्यापर्यंत ‘एमपीएससी’कडून संयुक्त परीक्षेची जाहिरात येणे अपेक्षित होते. मात्र, इतकेदिवस उलटूनही अद्याप पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढलीय. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना गट ब आणि क पदांसाठीच्या जाहिरातीची आशा लागलीय.
मागच्या वर्षी 7 हजारांवर जागांसाठी जाहिरात –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (एमपीएससी) राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा दरवर्षी घेतली जाते. संयुक्त परीक्षेच्या मागील वर्षी 7 हजारांवर जागांसाठी जाहिरात आली होती आणि यासाठी एप्रिल 2023 मध्ये यासाठी परीक्षाही घेण्यात आली. यावर्षीही जवळपास 8 हजार जागांसाठी ही जाहिरात येईल, अपेक्षेने विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असताना त्यांना अजूनही जाहिरातीची प्रतिक्षा करावी लागतेय. तर दुसरीकडे . राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थी हे पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन परीक्षेची तयारी असल्याने त्यांना त्याठिकाणी परीक्षा वेळेत न झाल्याने दडपण येत असल्याचेही दिसून येते.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : महिला सुरक्षेवर परखड मत, जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची विशेष मुलाखत