• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“…तुमची जीभ छाटली का?, मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर आक्रमक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 18, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
“…तुमची जीभ छाटली का?, मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर आक्रमक

मुंबई, 18 मार्च : राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री हे औरंगजेबासारखे क्रूर प्रशासक आहेत, अशी टीका केली होती. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आक्रमक होत, सपकाळ यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणाले की, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना करत मुख्यमंत्री हे क्रूर प्रशासक असल्याचे म्हटले. खरंतर, मुख्यमंत्र्यांमध्ये कुठला क्रूरपणा त्यांना दिसला, त्यांनी काय केलं?…त्यांनी का कुणाचे डोळे काढलेत का?….त्यांनी तुमची जीभ छाटली का? त्यांनी काय कुणाची कातडी सोलली का?…नखे काढलीत? काय बोलयचं आणि कुणाची तुलना कुणासोबत करायची.

म्हणून औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचे काम थांबलं पाहिजे. ज्यांनी उदात्तीकरण केलंय..त्यांना निलंबित करण्याचं काम सरकारने केलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हा देखील देशद्रोहचं असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक होत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते? –
गेल्या दोन दिवसांपुर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबासोबत करत वादग्रस्त वक्तव्य केलं होते. औरंगजेब हा क्रूर शासक होता आणि देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत असून औरंगजेबाची कबर उचलून टाका, असे ते सांगत आहेत. यामुळे याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. मात्र, औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष असल्याचे सपकाळ म्हणाले होते.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अधिवेशनात उमटले आणि आज एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

हेही पाहा : Video : “ए शेर का बच्चा है, खुलेआम किया! आप मै हिम्मत है?”, DCM Eknath Shinde आक्रमक 

बातमी शेअर करा !
Share
Tags: aurangzebdevendra fadnaviseknath shindeeknath shinde speechmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page