जळगाव, 20 मार्च : मुंबईतील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांची नियुक्ती तडकाफडकी रद्द करण्यात आली असून त्यांच्या जागेवर अॅड. महेश मुळे यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, विधी व न्याय विभागाच्यावतीने काढण्यात आलेले हे आदेश तात्काळ रद्द करून पूर्वीचे विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांची सदर खटल्याची सुनवाणी पुर्ण होईपर्यंत नियुक्ती कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य बहुजन मुक्ती पार्टी, आदिवासी तडवी भिल्ल महिला मंडळ जळगाव या संघटनांतर्फे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले. दरम्यान, शासनपर्यंत आपली समस्या पोहचविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आले.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण –
मुंबई येथील नायर हॉस्पिटल, टोपीवाला मेडीकल विद्यालय येथे एम.डी.चे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी या तरूणीने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळेच तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर रुग्णालयातील तीन सहकारी महिला डॉक्टर भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली होती. यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी या तिघिंवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील वकील बदलला –
या प्रकरणात अॅड. प्रदीप घरात यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर मुंबईतील जिल्हा व सत्र न्यायालयात अनुसुचित जातीजमाती प्रतिबंधक कायदा 1989 तथा आत्महत्यास प्रवृत्त अशा विविध कायदेअंतर्गत दोषरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, विधी व न्याय विभागाने 7 मार्च 2025 रोजी पत्रद्वारे प्रदीप घरात यांची नियुक्त रद्द करत अॅड. महेश मुळे यांची डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात नियुक्ती केली.
आंदोलनाचा इशारा –
दरम्यान, डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात विधी व न्याय विभाने पारित केलेले पत्र तात्काळ रद्द होऊन अॅड. प्रदीप घरात यांची नियुक्ती कायम ठेवण्यात यावी अशी मागणी निवदेनाच्या माध्यमातून करण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यास राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य व बहुजन मुक्ती पार्टी, आदिवासी तडवी भिल्ल महिला मंडळ जळगावच्या वतीने सनद शीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि यापासून होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहिले, असा इशारा देखील निवदेनाच्या माध्यमातून देण्यात आला.
यांची होती उपस्थिती –
यावेळी पिडीत डॉ.पायल तडवी यांची आई आबेदा तडवी, अॅड. रणजीत तडवी तसेच राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य महासचिव रौनक राज्य कार्यकारणी सदस्य जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश तडवी, तालुका उपाध्यक्ष मुस्तुफा तडवी, सिराज तडवी, मोमीन तडवी, दादा तडवी, बहुजन मुक्ती पार्टीचे जामनेर तालुका अध्यक्ष राहुल सपकाळे,आदिवासी तडवी भिल्ल महिला मंडळ जळगावचे पदाधिकारी मंजू तडवी, अलिशान तडवी, सीमाताई तडवी, मीना तडवी, हसीना तडवी, आशा तडवी, बशारात तडवी आफ्रोट संघटनेचे पदाधिकारी लुकमान तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत प्रदीप घरात? –
वकील प्रदीप घरात हे मुळचे अलिबागचे असून ते सध्या मुंबईत राहतात. घरात हे जवळपास दोन दशकांहून अधिक काळापासून वकिली पेशात आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या कारकीर्दितला बराचसा काळ सरकारी वकील म्हणून काम केले आहे. दरम्यान, 2015 मध्येच मुंबईच्या मालवणीत विषारी दारू पिऊन 105 जणांचा जीव गेला होता. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारनेही घरत यांनाच सरकारी वकील म्हणून नेमले होते. यासोबतच घरात यांनी आतापर्यंत जवळपास 30 हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली असून यापैकी तब्बल 25 प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.
त्यामुळेच, आरोपीला जन्मठेप मिळवून देण्यात मास्टरी असलेले वकील म्हणूनही त्यांची ख्याती आहे. प्रदीप घरात यांची अशी पार्श्वभूमी असल्यामुळे डॉ. पायल तडवी प्रकरणात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, विधी व न्याय विभागाने त्यांची नियुक्ती रद्द केल्याने या प्रकरणात घरात यांना कायम ठेवावे, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा : वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘ही’ वेळ