ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 26 जून : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधधीचे निवेद पाचोरा पोलिसांना देण्यात आले.
जळगाव शहरातील समतानगर मध्ये काही समाज कंटकांकडून 24 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी दोषींना लवकरात लवकर अटक करुन त्यांना जलद न्यायालयाकडून कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
यासंबंधी संघटनेच्या वतीने पाचोरा पोलिसांना निवेदन देण्यात आले. कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी संघटनेच्या पदाधिकारी संगिता साळुंखे, लता सपकाळे, सुनिल कदम, अनिल लोंढे, मेजर संतोष कदम, विषाल बागुल, आधार सोनवणे, राजेश सोनवणे, शांताराम खैरे, किरण निकम, आदी उपस्थित होते.