जळगाव, 29 जानेवारी : संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे. तेव्हाच संघटनेच्या कामाला गती येऊन समाजाचा विकास साधता येतो, असे प्रतिपादन प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी केले. प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली.(रजि भारत सरकार) च्यावतीने जळगाव जिल्हा आढावा मिटींग व नवनियुक्त पदाधिकारी यांचे ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
संघटनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपजी मोहिते यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम झाला. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर कापडे हे होते. तसेच जळगाव येथे संघटनेचे जिल्हा संपर्क अधिकारी विजय शिंदे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा भारती कुमावत यासुद्धा उपस्थित होत्या. मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा जनसंपर्क अधिकारी विजय शिंदे यांनी केले. तर जिल्हा अध्यक्ष कापडे साहेबांनी मागील संघनेच्या कामाचा आढावा सांगितला.
संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दुसाने यावेळी काय म्हणाले?
दुसाने सर यांनी बोलताना सांगितले की, संघटनेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे. तेव्हाच संघटनेच्या कामाला गती येऊन समाजाचा विकास साधता येतो. कार्यक्रम सुरू असतांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपजी मोहिते सर यांनी भ्रमणध्वनी द्वारे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा – जळगाव : डॉ. नयना महाजन यांची डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्यपदी नियुक्ती
संघटनेच्या जळगांव जिल्हा महिला अध्यक्षा डॉ. नयना झोपे यांची नुकतीच डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्र-प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर समाजसेवक मुकुंद मेटकर यांना शिंपी समाज चिंतामणी पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचा संघटनेच्या वतीने यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देण्यात आले. शेवटी संघटनेचे जळगांव जिल्हा निरीक्षक इमरानभाई शहा यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.