खान्देशातील काँग्रेस पक्षाचे मोठे नेते, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, आदी. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी अहिराणी फटकेबाजी करत जोरदार भाषण केले. तसेच त्यांनी त्यांनी भाजपात का प्रवेश करत आहे, हेसुद्धा सांगितले.