• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 27, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 27 जुलै: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नर्मदा स्कूलमध्ये भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम घडविणारा भव्य विठ्ठल-रुक्मिणी दिंडी व पूजन सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भारावून गेला.

कार्यक्रमाला नर्मदा स्कूलचे संस्थापक तथा आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी किशोर आप्पा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनिताताई पाटील, सुमित पाटील तसेच प्रवीण पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने झाली. किशोर आप्पा पाटील आणि सुनिताताई पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. “पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल” या अखंड नामघोषात विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी भक्तिभावाने सहभाग नोंदविला.

यानंतर संगीत शिक्षक रितेश भोई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि भक्तिगीतांचे सुरेल सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य विठ्ठल-रुक्मिणी दिंडीत विद्यार्थ्यांनी विठोबा, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मीराबाई तसेच वारकरी यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. ढोल पथकाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.

यावेळी किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत दिंडीत सहभागी होत त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. प्रसाद ग्रहण करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, सामाजिक मूल्ये आणि भक्तीभाव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.

या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या राधिका प्रभू, उपप्राचार्य जॉन सर, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, जनसंपर्क अधिकारी समाधान पवार, तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नर्मदा स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय आणि संस्कारमय उपक्रमाचे पालक व नागरिकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची बीजे रुजविणारे असे उपक्रम सातत्याने राबविले जावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: ashadhi ekadashi 2026dindi sohalamarathi newsnarmada international schoolpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page