ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 1 ऑगस्ट : भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे आज महसूल पंधरवडा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महसूल दिनानिमित्त महसूल विभाग व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तसेच विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी भडगाव तहसीलदार विजय बनसोडे, सर्कल भाऊसाहेब भारत पाटील, तलाठी शिंदे, तलाठी गायत्री पाटील, तलाठी राहुल माळी, तलाठी शुभम चोपडा, योगेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश अमृत पाटील, शिवसेना नेते विकास पाटील, शेतकी संघ चेअरमन भैय्यासाहेब पाटील, तालुका समन्वय समिती अध्यक्ष युवराज आबा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, माजी सैनिक शिवसेना समाधान पाटील, शेतकी संघ संचालक अमोल पाटील, माजी तालुकाप्रमुख विलास पाटील, संजय वेलजी पाटील, भाऊसाहेब पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख रत्ना पाटील, शिवसेना सीमा पाटील तसेच महसूल विभागाचे तसेच वनविभाग व परिसरातील सरपंच तसेच परिसरातील व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महसूल पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन –
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सोपी व्हावी यासाठी महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट राबविला जाणार आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले जाणार असून नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाचा प्रारंभ केला जाणार आहे.
हेही वाचा : धक्कादायक! इमारतीवरुन उडी मारुन MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी?