ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 22 मे : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूच्या धंद्यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई व्हावी, यासाठी सातगाव डोंगरी येथील ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांनी पिंपळगाव पोलिसांना निवदेन दिले आहे. दरम्यान, वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याचे या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांनी पिंपळगाव पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सातगांव (डोंगरी) ता. पाचोरा हे गाव कपाशी व्यापारी जास्त असल्याने त्या ठिकाणी मजुर जास्त प्रमाण आहेत. लहान वयात मुलांना दारूचे व्यसन संगत गुणामुळे जास्त प्रमाणात लागले असून ते ताबडतोब बंद करण्यात यावे. तसेच परिसरात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून त्याविरोधात कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून सांगितले आहे.
पिंपळगाव पोलीस कारवाई करणार का? –
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पिंपळगाव पोलिसांनी अवैध धंद्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. दरम्यान, आता नुकतीच लोकसभा निवडणूक संपली असून परिसरात पुन्हा एकदा अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, वाढत्या अवैध धंद्यांविरोधत पिंपळगाव पोलीस कारवाई करणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले अन् डॉक्टराची 19 लाखांत केली फसवणूक, जळगावातील नेमकी काय घटना?