पारोळा, 1 जुलै : एरंडोल-पारोळा मतदार संघात पुढील 10 दिवस अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे डॉक्टर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
डॉक्टरांचा सन्मान –
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पारोळा-एरंडोल मतदारसंघातील डॉक्टरांना आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख अमृत चौधरी, नगरसेवक राजु कासार, सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील, पंकज मराठे, आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय डॉक्टर दिन माहिती –
देशात सन 1991 पासून एक जुलै हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बी. सी. रॉय यांच्या आठवणीप्रित्यर्थ हा दिवस डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जात असतो. डॉ. बी.सी रॉय हे स्वतः डॉक्टर तर होतेच, पण त्यासोबतच शिक्षणतज्ज्ञ आणि राजकीय नेते देखील होते. 1950 ते 1962 या काळात ते पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री होते. एक जुलै ही त्यांच्या जन्माची आणि मृत्यूचीदेखील तारीख आहे. भारतरत्न या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना 1961 साली गौरविण्यात आले. त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आणि प्रेरणा म्हणून 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करतो.
हेही वाचा : मोठी बातमी! पंकजा मुंडेंसह भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर