वाशिंग्टन (अमेरिका), 7 नोव्हेंबर : 2024 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असे म्हटले जात असताना नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीस जगातील महासत्ता संबोधल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. चार वर्षांच्या कालवधीनंतर डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे बनले राष्ट्राध्यक्ष बनले असून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांनी पराभव केला आहे.
कमला हॅरिस यांचा ‘असा’ केला पराभव –
अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. वयाच्या 78 व्या वर्षी ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना 50 राज्यांतील 538 जागांपैकी 277 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 270 चा आकडा त्यांनी ओलांडला असून कमला हॅरिस यांनी 224 जागा जिंकल्या आहेत.
चार वर्षांच्या कालवधीनंतर ट्रम्प पुन्हा बनले राष्ट्राध्यक्ष –
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 2016 साली राष्ट्राध्यक्ष बनले होते. मात्र, 2020 निवडणुकीत जो बायडेन यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतर आजवरच्या काळातील ट्रम्प हे अमेरिकेतील असे नेते आहेत की, जे चार वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले असून जानेवारीत ते 20 जानेवारीला राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेणार असून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन निवडून आलेल्या ट्रम्प यांच्याकडे सत्ता सोपवतील.
पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन –
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. माझे मित्रवर्य डोनाल्ड ट्रम्प तुमचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत मोदींनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले.
हेही वाचा : महिला व मुलींना मोफत बस प्रवाससह महाविकास आघाडीची महाराष्ट्राला पाच गॅरंटी; नेमक्या काय आहेत घोषणा?