अमळनेर, 6 सप्टेंबर : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे आगमनाला अवघे काही तास उरले असताना सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी स्वागताची तयारी सुरु आहे. उद्या, गणेश चतुर्थी असून गणरायांचे आगमन होणार आहे. यंदाचा गणेशोत्सव दहा नव्हे, तर अकरा दिवसांचा असणार आहे. दरम्यान, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जल्लोष करण्यासाठी अतिरिक्त एक दिवस मिळणार असताना गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
अमळनेर शहरात आज सायंकाळी बाजारपेठेत गणरायांच्या भक्तांनी तसेच विविध गणेश मंडळाच्या टीमने गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली. यावेळेस पोलीस प्रशासनाकडून पाचपावली चौफुलीवर तसेच दगडी दरवाजा, तिरंगा चौक, इत्यादी ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
यावेळी वाहनधारकांचीही वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलीस प्रशासनकडून सहकार्य मिळताना दिसून आले. यावेळी नागरिकांनी गणेश मूर्ती, फुल-हार, पूजेचे साहित्य, फळ, श्रीफळ, केळीचे खांब, गणेशोत्सवासाठी लागणारे डेकोरेशन इत्यादींच्या दुकानावर गर्दी करत खरेदी केली. परिणामी “श्रीं” च्या स्थापनेकरिता अमळनेरात नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे युट्यूब चॅनल सब्सस्क्राईब करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews
अमळनेर हे ‘बुद्धीची देवता आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ‘श्रीगणेशा’चे स्वागत करण्यासाठी अमळनेर येथील नागरिक सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले. परंपरेनुसार, उद्या घरोघरी वाजतगाजत गणरायाचे आगमन होणार आहे. उद्या शनिवारी दि. 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1:51 पर्यंत ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना करता येणार आहे. मात्र, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीची प्रतिष्ठापना दुपारनंतरही करता येऊ शकते.
हेही वाचा : “राष्ट्रवादीत यायचं असेल तर खडसेंनी…”, जळगावात डॉ. सतीश पाटील नेमकं काय म्हणाले?