नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : “मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका मी आधीच जाहीर केली आहे. यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होण्यात कुठलाही अडथळा नाहीये. लाडक्या बहिणींबाबतही बोललो आहे. आता लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आणि ‘लाडका भाऊ’ ही ओळख माझ्या सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे”, अशा शब्दात राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीआधी प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtube.com/shorts/QoqaiztvHSs?si=oVhK3utmnnib653Chttps://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल –
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्यातील भाजप, शिवसेना (शिंदे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक नवी दिल्लीत पार पडत आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आधीच दाखल झाले. यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले.
महायुतीचा मुख्यमंत्री होण्यात कुठलाही अडथळा नाही –
माध्यमांसोबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालच पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होण्यात कुठलाही अडथळा नाहीये. आज मी अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालो आहे. अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा होणार असून बैठकीत जे होईल ते तुम्हाला सांगण्यात येईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीआधी दिली आहे.