ठाणे, 27 नोव्हेंबर : जीवन मे असली उडाण अभी बाकी हैं…अभी तो नापी हैं मुठ्ठीभर जमीन..अभी तो सारा आसमान बाकी हैं!, असे म्हणत आम्हाला खूप काम करायचे आहे. तसेच आमची महायुती मजबूत असून मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ जे निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनला मान्य असेल आणि आम्ही भक्कमपणे त्या निर्णयाच्या पाठीशी राहू, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका केली स्पष्ट –
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद नेमकं कोणाला मिळणार यावरुन चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या देखील बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान, आज राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेत त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवेसनेचे नेते दादा भूसे, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत आमच्या सरकारने सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व घटकांसाठी लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. यामध्ये लाडकी बहिण असेल किंवा शेतकरी तसेच युवक-युवतींसाठी राबविण्यात योजना असतील. याचा सर्वांना मोठा फायदा झाला. आणि म्हणून महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात साथ दिल्याने सर्वप्रथम महाराष्ट्रातील मतदारांचे मी मनापासून आभार मानतो.
लाडका भाऊ अशी मिळाली ओळख –
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, माझी परिस्थिती सर्वसामान्य कुटुंबासारखी राहिलेली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी मला समझतात. यामुळे मला जनतेसाठी ज्यावेळी काही करण्याची संधी प्राप्त होईल त्यावेळी निश्चितपणे मी त्यांच्यासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करण्याचा माझा मानस होता. यानंतर माझी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर महायुतीच्या आमच्या सर्व नेत्यांच्या सहकार्याने राज्यात महिला बघिंनींसाठी लाडकी बहिण योजना आणली. या योजनेचा मोठा लाभ हा सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना झाला. दरम्यान, लाडक्या बहिण योजनेमुळे माझी आता लाडका भाऊ अशी ओळख झाली आहे आणि कुठल्याही पदापेक्षा मला ही ओळख मोठी वाटते, असेही शिंदे म्हणाले.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत फोनवरुन चर्चा –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर सरकार स्थापनेबाबत माझी पंतप्रधान मोदी तसेच अमित शहा यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. यावेळी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, सरकार बनवताना माझ्यामुळे कुठलेही काही अडचणीचे ठरत असेल तर हे मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे. राज्याचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी दिली. यामुळे महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय जसा भाजपला मान्य असेल तसा आम्हालाही मान्य असेल.
मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचा निर्णय मान्य –
भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्री बनवण्याबाबतचा जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयाला पुर्णपणे शिवसेनेचे समर्थन तसेच पाठिंबा आहे. मुख्यमंत्री निवडीसाठी आमचीही देखील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत बैठक हाईल आणि त्या बैठकीत जो काही निर्णय होईल..तो आम्हाला (शिवसेना) मान्य असेल, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषेदनंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना विराम मिळाला आहे.
हेही वाचा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..