चोपडा, 31 ऑक्टोबर : चोपडा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विधानसभा निवडणूक कर्तव्यासाठी आदेश मिळालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शरश्चचंद्रिका सुरेश पाटील नाट्यगृह चोपडा येथे संपन्न झाले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी नरेंद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण संपन्न झाले.
निवडणुकीसाठी निवडणूक केंद्रावर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने करावयाच्या कामासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मतदान केंद्रावर काय करावे आणि काय करू नये याविषयीच्या सविस्तर सूचना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आल्या. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे –
2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे हे चोपड्याचे आमदार म्हणून प्रथमतः निवडून आले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी लताताई सोनवणे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकेकाळी भाजपमध्येमध्ये असलेले प्रभाकर सोनवणे ह्यांनी 2019 साली अपक्ष निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना लताताई सोनवणे यांना अपक्ष उमेदवार म्हणून मोठे आव्हान दिले होते. आणि आता त्यांना शिवसेनना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे चोपड्यात प्रा. चंद्रकांत सोनवणे विरूद्ध प्रभाकर सोनवणे अशी जोरदार लढत रंगणार आहे.
हेही वाचा : Video : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार?, थेट जनतेशी संवाद…